Maval : मानवी जीवनात भक्ती महत्त्वाची – गुलाबराव महाराज खालकर

एमपीसी न्यूज – मानवाला आत्मकल्याणासाठी भक्ती महत्वाची असून माणसाच्या जीवनाला भक्ती तारते व अहंकार मारतो असे प्रतिपादन  श्रीगुरू पूजनाचे निरूपण करताना गुलाबराव महाराज खालकर यांनी केले.अर्जुन,एकलव्य,श्रीराम, गोरक्षनाथ,शांडिली यांच्या भक्तीचे दाखले देत खालकर महाराज यांनी गुरुचे महत्त्व  विशद केले.स्वामीचे कार्य करावे, गुरूची सेवा करावी,पितृ वचनाचे आज्ञापालन करावे आणि पतीची सेवा करावी त्यातच विष्णूची महापूजा घडते, तसेच देवाच्या सेवेपेक्षा गुरूसेवा श्रेष्ठ आहे असेही त्यांनी सांगितले.

मौजे कल्हाट, तालुका मावळ येथे महंत सद्गुरु किसननाथ बाबा यांच्या 13 व्या पुण्यस्मरणानिमित्त व बालकनाथ बाबा यांच्या गुरूपूजनानिमित्त ग्रामस्थ  व आंदर मावळातील साधकांनी आयोजित केलेला सद्गुरु पूजन सोहळा व गुरूनामाचा,सोहळा  (Maval)आनंदाचा ह्या कार्यक्रमात स्वामीकाज गुरूभक्ती l पितृवचन सेवा पति ll हेचि विष्णूची महापूजा l अनुभव नाही दुजा ll या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण करताना गुलाबराव महाराज खालकर (Maval) बोलत होते.

याप्रसंगी रोहिदास महाराज धनवे,तुकाराम गाडे,नारायण ठाकर, काळुराम मालपोटे,बाबाजी महाराज काटकर,पांडुरंग लालगुडे, गोपीचंद महाराज कचरे,सुखदेव महाराज ठाकर,नाथा महाराज शेलार, गुलाब महाराज कुंभार,विकास महाराज खांडभोर,दिलीप महाराज खेंगरे,गणेश महाराज मोहिते,बजरंग तांबोळी,दिगंबर आगिवले,तानाजी करवंदे हनुमंत हांडे,संभाजी मालपोटे, रोहिदास चोपडे,रघुनाथ चोपडे,सरपंच शिवाजी  करवंदे,उपसरपंच देवीदास धनवे, ग्रामपंचायत सदस्यसह ग्रामस्थ व माताभगिनी तसेच मावळ तालुका दिंडी समाजातील पदाधिकारी, वारकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

गुलाबराव खालकर महाराज गुरूभक्तीचे महत्व सांगताना म्हणाले की,गुरू द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवून शिष्य एकलव्याने एकनिष्ठ भक्ती करून गुरूच्या आज्ञेने स्वतःच्याच उजव्या हाताचा अंगठा कापून गुरू दक्षिणा दिली. पितृ वचनास्तव प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासाला गेले, आपल्या स्वामी मच्छिंद्रनाथांसाठी श्री गोरक्षनाथांनी केलेले कार्य,आपल्या पतीसाठी शांडिलीने केलेली सेवा असे  दाखले देत खालकर महाराज यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

जीवनात प्राधान्य हे भक्तीला आहे. म्हणूनच जीवनात माणसाला भक्ती तारते अन अहंकार मारतो. स्वामीची आज्ञा असताना भक्ताकडून निंद्य अथवा चुकीचे कर्म घडले तर पाप नाही तर पुण्यच लाभते असेही महाराजांनी यावेळी सांगितले. रविवार (दि 31) सकाळी श्रीची महापूजा व हारतुरे, ज्ञानेश्वरी पारायण, सत्यनारायण महापूजा, महंत सद्गुरु बालकनाथबाबा यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नंदी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हरिपाठ व सायं साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत चिंतामण महाराज बच्चे यांचे प्रवचन झाले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता  किसननाथ बाबा व बालकनाथ बाबा यांच्या साधकांनी तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम स्वागत,सूत्रसंचालन बाळासाहेब थरकुडे,संतोष करवंदे,नवनाथ कल्हाटकर या मान्यवरांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.