Chinchwad : ‘चांद्रयान 3’च्या यशाबद्दल चिंचवडगावात जल्लोष

एमपीसी न्यूज – चांद्रयान 3′ यशस्वीपणे (Chinchwad) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले. या यशाबद्दल चिंचवडगाव सराफ बाजार येथे चिंचवड (जैन) विहार सेवा ग्रुपच्या वतीने फटाके वाजवून, पेढे वाटत तिरंगा घेत जल्लोष करण्यात आला.

यावेळी विवेक जैन, प्रवीण सोनीगरा, मनीष सोनीगरा, संजय बाफना, संजय कटारिया, आनंद मुथा, जितेश राठौड, हर्षद लुंकड़, रवि पाडोले, विनय दुगड, निखील खिवसरा, नयन तन्ना, सचिन धोका, कपिल मेहता उपस्थित होते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पाठवलेले (Chinchwad) चांद्रयान 3 आज (बुधवारी, दि. 23) सायंकाळी चंद्रावर यशस्वीपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हे भारताचे सर्वात मोठे यश असून या यशाबद्दल देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे.

Maval : सहारा वृद्धाश्रमात आलाप एंटरटेनमेंटचा ऑर्केस्ट्रा; निराधार वृद्धांचे मनोरंजन

पिंपरी चिंचवड शहरात देखील सर्वजण आनंद साजरा करीत आहेत. चिंचवड (जैन) विहार सेवा ग्रुपच्या वतीने फटाके वाजवून, पेढे वाटत तिरंगा घेत जल्लोष करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.