Pimple Gurav : अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

एमपीसी  न्यूज – माणूस रडण्यासाठी जन्माला आलेला नाही, तर पक्षांप्रमाणे स्वच्छंदपणे उडत संकटावर मात करण्यासाठी त्याचा जन्म झालेला आहे. त्यामुळे माणसाने कुडत कुडत जगण्यापेक्षा स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन महाराज वाव्हळ यांनी केले. मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार ही व्यक्ती समाजासाठी, मुक्या प्राण्यांसाठी देवमाणूस आहे. सामाजिक बांधिलकीचे भान असणारे, अध्यात्माची गोडी असणारे सत्वशील व्यक्तिमत्व आहे, असेही डॉ. वाव्हळ यांनी सांगितले. 

मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. डॉ. गजानन वाव्हळ यांच्या ’एक अनोखी शब्दमैफिल : आनंदाचे डोही’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. वाव्हळ यांनी विविध विषयावर विचार व्यक्त केले.

वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना 500 तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच पिंपळे गुरवमधील विठ्ठल भजनी मंडळ, जोगेश्वरी भजनी मंडळ, साधना भजनी मंडळ, भीमाशंकर भजनी मंडळ या भजनी मंडळांना टाळ, मृदुंग, वीणा, तबला, पेटी आदी भजनी साहित्य भेट देण्यात आले. तसेच आदिवासी भागातील गरजू गुणवंत विद्यार्थी समर्थ रामचंद्र पानसरे याचा शैक्षणिक आर्थिक मदत व सन्मान चिन्ह देऊन सन्मान, रंगोत्सव सेलिब्रेशन ऑर्गनायझेशन फॉर नँशनल लेवलमध्ये सुवर्णपदक विजेती त्रिशा बंडेवार हिचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच एक हजार कि.मी. सायकल प्रवास मनाली ते लेह-लडाख यशस्वी रित्या पार केल्याबद्दल साईदीप धोंडगे यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, ह.भ.प.विश्वनाथ वाखारे,  ह.भ.प तुकारामभाऊ महाराज, ह.भ.प तांदळे महाराज, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, पोलीस पाटील जयसिंगदादा पाटील, विजूअण्णा जगताप, नगरसेविका माई ढोरे, उषा मुंढे, साविताताई खुळे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक नाना काटे, संतोष कांबळे, हर्षल ढोरे, सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, स्वि. नगरसेवक गोपाळ माळेकर, उद्योजक बालाजी पवार, बिभिषण चौधरी, विनोद तापकीर, सामाजिक कार्यकर्ते श्यामजगताप, अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, बाळासाहेब जवळकर, संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य आदिती निकम, उद्योजक सतीश काशीद, मनिष कुलकर्णी, माधव मनोरे, संतोष जगताप आदी उपस्थित होते.

मरकळ येथे केशवराज विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी व ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमर्गेकर, सुभाष घेनंद, राजाराम लोखंडे, भगवान लोखंडे, बाजीराव लोखंडे, लालाअण्णा माळी, सागर लोखंडे, शंकर सुतार, प्राचार्य उत्तम जाधव, हरितसेना सदस्य आर.टी. लाटे आदी उपस्थित होते. वडगाव शिंदे येथील आबासाहेब गोसावी माधामिक विद्यालयात 350 विद्यार्थी-विद्यार्थिनींना वह्या, कम्पासपेटी आणि इतर शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली आणि संचेती इन्स्टिट्यूट फाँर ऑर्थोपेडीक आणि रीह्याबिलेटेशन पुणे यांच्या संयुक्तपणे आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, सरपंच विजय शिंदे, उपसरपंच सुकेशिनिताई गायकवाड, विलास शिंदे, भरत काकडे, मुख्याध्यपक कल्याण बरडे, मुख्याध्यापिका ज्योती माने, तंटा मुक्ती अध्यक्ष राम काकडे आदी उपस्थित होते. सुमारे चारशे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
ममता अंध-अनाथ केंद्रात उद्योजक सोमनाथ भोसले यांनी फळे, धान्य, तेल, तांदूळ, गहू, केळी, सफरचंद, डाळिंब आणि दररोज लागणार्‍या गरजू वस्तूंचे वाटप केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे, वामन भरगांडे यांनी; तर आभार सूर्यकांत कुरूलकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.