Chinchwad : चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या होमगार्डवर हल्ला

एमपीसी न्यूज – संशयित दुचाकीचा पाठलाग करताना चोरट्यांनी होमगार्ड केलेल्या हल्ल्यात होमगार्ड जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 21) पहाटे चिंचवड (Chinchwad) येथे घडली.

Maharashtra : धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे – मुख्यमंत्री

गौरव प्रमोद कुलकर्णी (वय 25) जखमी झालेल्या होमगार्डचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधरनगरचे बीट मार्शल प्रशांत भालचंद्र पानसरे आणि होमगार्ड गौरव कुलकर्णी हे चिंचवड परिसरात गस्त घालत होते. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास त्यांना संशयित दुचाकी दिसली. पोलिसांनी त्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी चोरट्यांनी दुचाकी गावडे पार्क येथे टाकून दिली व दुसऱ्या दुचाकीवरून पळ काढला.

पोलीस संशयित दुचाकीचा शोध घेत असताना त्यांना लोकमान्य हॉस्पिटलच्या पुलाजवळ पुन्हा संशयित दुचाकी दिसली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा दुचाकीचा पाठलाग सुरू केला. चोरटे पुणे मुंबई रस्त्यावर आले. पोलीस त्यांचा पाठलाग करीत असताना दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने एम्पायर इस्टेट बस थांब्याजवळ अज्ञात हत्याराने होमगार्ड गौरव कुलकर्णी यांच्या कपाळावर मारून जखमी केले. त्यानंतर चोरटे पुण्याच्या दिशेने पळून गेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.