Bhosari : रस्त्यात आढळून आलेली गौरीची मूर्ती सृष्टी भैरगोंड यांच्या घरात विराजमान

एमपीसी न्यूज- भोसरी येथील सृष्टी भैरगोंड यांना मागील वर्षी गौरीची एक मूर्ती रस्त्यामध्ये पडलेली आढळून आली. त्यांनी त्या मूर्तीची विधिवत पूजा करून घरामध्ये स्थापित केली. यंदा प्रथमच त्यांच्या घरी उभ्या लक्ष्मी स्थापित करण्यात आल्या असून या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. भाविक या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. या मूर्तीमुळेच त्यांच्या उद्योगामध्ये भरभराट झाल्याचे शिव भैरगोंड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.