Wakad : बिल्डिंग मटेरियल सप्लायरची बांधकाम व्यावसायिकाकडून 30 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बिल्डिंग मटेरियल खरेदी करून त्याचे पैसे न देता बिल्डिंग मटेरियल सप्लायरची बांधकाम व्यावसायिकाने 30 लाख 49 हजार 595 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान वाकड परिसरात घडली.

परमानंद मेल्हुमल जमतानी (वय 62, रा. आनंद पार्क, औंध) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गौरव सोनी इन्फ्रा प्रा. लि. या बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव सोनी इन्फ्रा प्रा. लि. या बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या संचालकाने जमतानी यांना त्यांच्या बांधकामाच्या साईट्स विविध ठिकाणी सुरु असल्याचे सांगितले. त्यासाठी आवश्यक बिल्डिंग मटेरियल आणि सळई असे 30 लाख 49 हजार 595 रुपयांचे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी घेतले. परंतु घेतलेल्या साहित्याचे पैसे जमतंय यांना दिले नाहीत. त्यावरून जमतानी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.