Pune : तन्मय मंगेश साळवेकरची ‘चायनीज ब्रीज ‘ भाषा प्रभुत्व स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज- मिलेनियम स्कुलचा विद्यार्थी तन्मय मंगेश साळवेकर याची चीनमधील ‘चायनीज ब्रीज ‘ या भाषाप्रभुत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तन्मय हा चायनीज भाषा शिकत असून चायनीज ब्रीज स्पर्धेमध्ये तो भारताचा प्रतिनिधी म्हणून निवडला गेला आहे.

त्याला ‘यीन -यांग सेंटर फॉर चायनीज लँग्वेज ‘ च्या संचालिका यशोधरा गाडगीळ व ईशानी कोतवाल यांनी मार्गदर्शन केले.

चायनीज ब्रीज स्पर्धा 7 ते 22 ऑक्टोबर दरम्यान खुन्मिंग ( युन्नान ) येथे होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.