Bhosari : दलदलीत अडकलेल्या वृद्धाची अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका

एमपीसी न्यूज – अनोळखी वृद्ध रोशन गार्डन भोसरी येथे फिरत (Bhosari) असताना दलदलीत अडकला. त्या वृद्धाची पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुटका केली. मारुती पिंगळे (वय 75) असे सुटका केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

लांडगे वस्ती मधील रोशन गार्डन येथे एक व्यक्ती दलदलीत अडकली असल्याची वर्दी श्रीकांत फुगे यांनी अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र आणि भोसरी उप केंद्राचे लीडिंग फायरमन सारंग मंगरुळकर, विठ्ठल घुसे, वाहन चालक जालिंदर जाधव, दत्त्तात्रय रोकडे, फायरमन विकास बोंगाळे, भूषण येवले, ट्रेनी सब ऑफिसर बापुसाहेब जाधव, ट्रेनी फायरमन प्रतिक अहिरेकर, भूपेश पाटील, सिद्धेश दरवेश, यश विरकर, सखाराम चिमटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Nigdi : उद्या समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे निगडीत होणार आगमन

दलदलीची जवानांनी पाहणी केली असता पाण्यात उगवलेल्या (Bhosari) झुडुपात एक वृद्ध व्यक्ती अडकून पडली होती. जवानांनी शिडी, रस्सी आणि लाईफ रिंग यांच्या मदतीने वृद्धास सुखरूपपणे बाहेर काढले. स्थानिक नागरिकांकडे वृद्धाबाबत चौकशी केली असता तो वृद्ध मागील दोन दिवसांपासून परिसरात भटकत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांना पाचारण करून वृद्धास पोलिसांच्या ताब्यात दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.