Bhosari : बस खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्यावेळी दुचाकीस्वार बसखाली चिरडला गेल्याने (Bhosari) त्याचा मृत्यू झाला.
हा अपघात सोमवारी (दि. 17) पहाटे अडीच वाजता पुणे-नाशिक महामार्गावर अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या समोर भोसरी येथे घडला.

अशोक वारके (वय 54, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांचा मुलगा उमाकांत अशोक वारके यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार बस (एमएच 06/एस7043) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील सोमवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गाने दुचाकीवरून जात होते.

अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या समोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला बसने पाठीमागून धडक दिली. त्यात अशोक हे रस्त्यावर पडले.

त्यानंतर त्यांच्या अंगावरून बस गेली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत (Bhosari) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.