Bhosari : टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक देत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  समोर जाणाऱ्या टेम्पोला पाठीमागून दुचाकीने  जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार तरुणाचा (Bhosari) मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.19) दुपारी मोशी येथील देहू रस्ता परिसरात घडला आहे.

 याप्रकरणी टेम्पो चालक गजानन त्र्यंबक दराडे (वय 34 रा मोईगाव) यांनी गुरुवारी(दि.20) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यावरून मयत दुचाकी स्वार शानएआलम वखार अहमद शेख (वय 21 रा मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील टाटा 407 टेम्पो घेऊन मोशी देहू रोडने चिखली कडे जात होते.

यावेळी जय भारत चौकाच्या अलीकडे मयत शेख यांनी त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने घेऊन आला व त्याने  फिर्यादीच्या टेम्पोला पाठीमागून धडक दिली.

यामध्ये शेख गंभीर रित्या जखमी झाला व यातच त्याचा मृत्यू झाला भोसरी एमआयडीसी पोलीसांनी याबाबत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील (Bhosari) तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.