Chinchwad : महापालिकेचे ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय स्थलांतरित, आता ‘येथे’ कार्यालय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय आतापर्यंत चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ क्वीन्सटाऊन शेजारी, चिंचवड येथे कार्यरत होते. पण हे कार्यालय चिंचवड (Chinchwad ) लिंक रोड येथील एल्प्रो मॉलच्या पाठीमागील बाजूस स्थलांतरीत झाले आहे.

Bhosari : टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक देत दुचाकीस्वाराचा मृत्यू

‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत एल्प्रो मॉलच्या पाठीमागील बाजूस महाकाली मंदिराजवळ उभारण्यात आली असल्याने आता ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे संपुर्ण कामकाज येथून पाहिले जाणार आहे. येत्या २४ जुलैला म्हणजे सोमवारी होणारी जनसंवाद सभा याच नवीन प्रशासकीय इमारतीत पार पडणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती ब क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांनी दिली.

ब क्षेत्रीय कार्यालयाचा पत्ता- ब क्षेत्रीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, एल्प्रो मॉलच्या पाठीमागील बाजूस, पिंपरी-चिंचवड लिंक रोड, चिंचवड, पुणे- ४११०३३

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.