Dighi : फुकट दूध दिले नाही म्हणून मसाला दूध ठेल्याची तोडफोड करत खंडणीची मागणी

एमपीसी न्यूज-  फुकट मसाला दूध दिले नाही म्हणून एका (Dighi) तरुणाने कोयत्याने सामानाची व ठेल्याची तोडफोड करत व्यवसायिकाकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. हा सारा प्रकार 15 जुलै रोजी आळंदी  देवाची येथील देहूफाटा येथे घडला.

Alandi : धक्कादायक! प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून जिवंत अर्भक झुडपांमध्ये फेकले

 याप्रकरणी गुरुवारी(दि.20) पृथ्वीराज शिवाजी पारधे (वय 27 भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनिकेत मेटकर उर्फ गुड्ड्या (वय 20 रा दिघी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची देहू फाटा येथे संतकृपा मसाला दूध कॉर्नर ची गाडी आहे.

आरोपी तिथे आला त्याने फिर्यादीला फुकट मसाला दूध व क्रीम रोल मागितला, यावेळी फिर्यादीने तो देण्यास नकार दिला.

याचा राग येऊन आरोपीने लोखंडी कोयत्याने ठेवल्यावर जोरजोरात मारत फिर्यादीला शिवीगाळ केली.

तसेच काउंटर वरील विक्रीच्या सामानाचे तोडफोड करून ग्राहकांना घाबरवले.

कोयत्याचा धाक दाखवून दर महिना 5000 रुपये खंडणी दे नाहीतर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.

यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Dighi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.