Moshi : पार्किंग व इतर सोयी सुविधा न दिल्याबद्दल बिल्डर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सोसायटी स्थापने आधीचे ( Moshi) लाईट बिल , पाणी बिल न भरता सोसायटी धारकांना पार्किंग ही दिले नाही, असा आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये  स्वप्नलोक हाउसिंग सोसायटी, मोशी मधील रहिवाश्यांनी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार 26 डिसेंबर 2015 पासून आज अखेर पर्यंत घडला आहे.

Mahavitaran : औद्योगिक ग्राहकांच्या तत्पर ग्राहक सेवेसाठी महावितरण कटिबद्ध – राजेंद्र पवार

याप्रकरणी ईश्वर भगवान रासकर (वय 53, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ट्युलीप प्रॉपर्टीज ,मोशी, अक्रम झाहील उल्ला चौधरी, भरत लालाराम चौधरी, बाबुलाल पूनाराम  (रा.मोरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नलोक डेव्हलपर्स यांनी फिर्यादी व सोसायटी येथील रहिवाश्यांना कोणताही हिशोब दिला नाही. तसेच सोसायटी स्थापने आधीचे वीजबिल,पाणी बिल भरले नाही, तसेच सुख सुविधा दिल्या नाहीत, पार्किंग दिली नाही केवळ आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक केली. यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Moshi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.