Pune : ‘सॅम बहादुर’ चित्रपटावर बंदीची काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची मागणी

राष्ट्रीय नेत्यांच्या विकृतीकरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – ‘सॅम बहादुर’ चित्रपटात  राष्ट्रीय नेत्यांच्या विकृतीकरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत  या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.
गोपाळ तिवारी म्हणाले,  दिग्दर्शक रॅानी स्क्रुवाला व मेघना गुजराल यांनी प्रदर्शित केलेला “सॅम बहादुर” या हिंदी चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदीरा गांधी यांचे चारीत्र्य हनन करण्याचा निंदनीय प्रयत्न केला आहे. या चित्रपटात, श्रीमती इंदीराजींच्या निर्णय क्षमतेविषयी व चारित्र्याविषयी शंका उपस्थित करणारे, गैरसमज वाढवणारे अवास्तव  अनावश्यक प्रसंग दाखवले आहेत.

याचा तीव्र निषेध व्यक्त करीत जनतेने अशा चित्रपटावर बहीष्कार टाकावा तसेच यावर बंदी आणावी. या कथित व अवास्तवदर्शी चित्रपटातून ‘स्वातंत्र्योत्तर भारत’ उभारणाऱ्या काँग्रेस नेत्यांविषयी, पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयश्री विषयी तथ्यहीन प्रसंग दर्शवून जाणीवपूर्वक गैरसमज दाखवल्याचे आढळून येते.
वास्तवतेला तिलांजली देत व असत्याचा आधार घेत, काल्पनिक चरीत्रे निर्माण करून नेहरू-गांधी कुटुंबियांप्रती द्वेषाने पछाडलेल्या हीन मानसिकतेचे दर्शन ‘सॅम बहादुर’ चित्रपटातून होते आहे.
पहीले पंतप्रधान पंडीत नेहरू व श्रीमती इंदीराजी गांधी यांना सतत कमकुवत, निर्णय क्षमताहीन दाखवण्याचा केलेला प्रयत्न निंदनीय असून काँग्रेसच्या आकसापोटी व राजकीय महाशक्तींच्या पाठबळावर या चित्रपटाची निर्मिती झाली असल्याचा आरोप काँग्रेसने केला ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.