Pune : नांदेड सिटी येथील सदनिका धारकांनी पीटी थ्री अर्ज भरल्यास टॅक्समध्ये 40 टक्के सवलत

एमपीसी न्यूज – नांदेड सिटी येथील सदनिका ( Pune) धारकांनी स्वरहिवास जागेवर पुराव्यासह पीटी थ्री अर्ज भरल्यास प्रत्यक्ष जागेवरच 40% सवलतीसह टॅक्स भरून घेतला जाईल, असे पुणे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Pune : ‘सॅम बहादूर’ चित्रपटावर बंदीची काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची मागणी

नांदेड टाऊनशिप चाळीस टक्के सवलतीबाबत शनिवार दिनांक 23 डिसेंबर आणि रविवार दिनांक 24 डिसेंबर तसेच दिनांक शनिवार 30 डिसेंबर व रविवार दिनांक 31 डिसेंबर रोजी कर विभागाकडील प्रत्येक दिवशी दोन दोन एस आय नांदेड ग्रामपंचायत कार्यालयातील ऑफिसमध्ये सकाळी 10 ते 6 पीटी थ्री अर्ज स्वीकारण्यासाठी बसतील. स्वरहिवासीचा पुराव्यासह  नागरिक यांनी जागेवर पीटी थ्री अर्ज भरून द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. स्वरहिवास जागेवर पुरावा सह पीटी थ्रीअर्ज भरल्यास प्रत्यक्ष जागेवरच 40% सवलतीसह टॅक्स भरून घेतला जाईल.

पीटी थ्री अर्ज propertytax.punecorporation.org ह्या वेबसाईट वरून download करून त्यासोबत मतदान ओळखपत्र/पासपोर्ट/वाहन चालक परवाना/गॅस कार्ड/रेशन कार्ड/आधार कार्ड/सोसायटी ना हरकत प्रमाणपत्र यापैकी कोणतेही दोन कागदपत्रे सोबत जोडणे ( Pune) आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.