Pimpri : आर्या म्हस्केची रौप्य पदकावर मोहर

भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत ( Pimpri)  येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आर्या म्हस्के हिने कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पिस्तूल शूटिंग स्पर्धेत (पंधरा वर्षांखालील वयोगटात) रौप्य पदकावर मोहर उमटवली. त्यामुळे आर्या म्हस्के हीची 27डिसेंबर रोजी भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Pune : नांदेड सिटी येथील सदनिका धारकांनी पीटी थ्री अर्ज भरल्यास टॅक्समध्ये 40 टक्के सवलत

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आर्या म्हस्के हीस राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा ( Pimpri) दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.