Bhosari : बेकायदेशीरपणे कीटकनाशके बनविल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  शासनाची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे कीटकनाशके तयार (Bhosari) करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मंगळवारी (दि. 25) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे शिल्ड लाईफ सायन्सेस अँड रेजींस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत करण्यात आली.

Pune : पुण्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांना दाखवले काळे झेंडे

शांतेश्वर विलास पाटील (वय 45, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी दत्ता नारायण शेटे (वय 42, रा. पिंपरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कुरुळी येथे शिल्ड लाईफ सायन्सेस अँड रेजन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये विनापरवाना कीटकनाशके तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी कंपनीमध्ये छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी तीन लाख 70 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास (Bhosari) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.