Pune : पुण्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांना दाखवले काळे झेंडे

एमपीसी न्यूज : भाजपचे नेते माजी खासदार (Pune) किरीट सोमय्या यांचा मध्यंतरी आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्याची घटना घडली होती. त्या विरोधात राज्यातील विरोधक आक्रमक होत किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या सर्व घडामोडी थांबत नाही. तोवर आज किरीट सोमय्या हे पुणे दौर्‍यावर आले होते.

त्यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे कार्यकर्त्यांसह पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात ‘somyya go back’चे फलक घेऊन आंदोलन करत काळे झेंडे दाखविले.

Hinjawadi : महिला ग्राहकासमोर अश्लील वर्तणूक करणाऱ्या विजय सेल्सच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे पुणे दौर्‍यावर आले असून ते पर्वती येथील भाजप पदाधिकारी पुष्कर तुळजापूरकर यांच्या घरी जेवण करण्यास येणार होते. पण त्यापूर्वी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे कार्यकर्त्यांसह पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात ‘somyya go back’चे फलक घेऊन आंदोलन करण्यास थांबले होते.

किरीट सोमय्या यांच्या जाण्याच्या मार्गावर कोणतीही अनुचित (Pune) घटना घडू नये. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या दिशेने धावत कार्यकर्त्यांनी ‘somyya go back’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.