Hinjawadi : महिला ग्राहकासमोर अश्लील वर्तणूक करणाऱ्या विजय सेल्सच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरी वस्तूंची डिलिव्हरी देण्यासाठी (Hinjawadi) गेलेल्या विजय सेल्सच्या कर्मचाऱ्याने महिलेसमोर अश्लील वर्तन केले. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.24) हिंजवडी येथे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शिवराज संजय आडसुळ (वय 22, रा.थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला सी आरपिसी प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.

Talegaon Dabhade : कचरा व्यवस्थापन करारात भ्रष्टाचार; कल्पेश भगत यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पोलिसांनी दिलेल्या (Hinjawadi) माहितीनुसार, फिर्यादी यांनी विजय सेल्समधून वॉटर प्युरीफायर व लॉकर मागवले होते. त्याची डिलिव्हरी करण्यासाठी आरोपी आला. त्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करत महिलेसमोर अश्लील वर्तन केले. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.