Talegaon Dabhade : कचरा व्यवस्थापन करारात भ्रष्टाचार; कल्पेश भगत यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापन करारात मोठ्या प्रमाणात (Talegaon Dabhade ) भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांनी केला आहे. कराराबाबत कुठलीही तांत्रिक मंजुरी न घेतल्यामुळे प्रकल्प किमतीपेक्षा पंधरा ते अठरा लाख रुपये जास्त दराने बिलिंग करण्यात येत असल्याचे भगत यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. चौकशीचे आदेश न दिल्यास 9 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, रोहित लांघे, चंदन कारके, सुनील कारंडे, संघटक योगेश पारगे, समीर दाभाडे, निलेश पारगे, दत्ता पारगे आदी उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्टमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांनी केला आहे. सदर भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी लेखी पत्रा्द्वारे मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केल्याचे भगत यांनी नमूद केले आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये अशोक इंटरप्राईजेस या नावाने कचरा व्यवस्थापनाचे कॉन्ट्रॅक्ट सुमारे दीड वर्षांपूर्वी देण्यात आले होते.

सदर कॉन्ट्रॅक्टबाबत कुठलीही टेक्निकल मंजुरी न घेतल्यामुळे प्रकल्प किमतीच्या पेक्षा पंधरा ते अठरा लाख रुपये जास्त दराने बिलिंग करण्यात येत होते. आज दीड वर्षानंतर टेक्निकल मंजुरी घेतल्यानंतर सदर बिलिंग 15 लाख रुपये कमी झालेले आहे असे मुख्याधिकारी यांनी कळवले आहे.

सदर दीड वर्षात वाढीव स्वरूपात गेलेला पैसा हा नागरिकांच्या कष्टाचा (Talegaon Dabhade ) टॅक्स स्वरूपातील नफा फंडातून खर्च केलेला पैसा आहे. दीड वर्षात वाढीव दराने गेलेला पैसा हा पुन्हा वसूल करण्यात यावा व सदर मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेले आहे.

Pimpri : खुन्नस दिली म्हणून अल्पवयीन मुलांकडून तरुणाला मारहाण

1) वाढीव स्वरूपात गेलेला दीड वर्षातील काळा पैसा पुन्हा नगर परिषदेच्या तिजोरीत जमा करावा.

2) मुख्याधिकारी यांच्या आशीर्वादाने दरमहा पंधरा ते अठरा लाख रुपये लाटलेले असल्यामुळे चौकशी करून सर्व आधिकार्‍यांवर कारवाई करावी.

3) सदर कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावे व फेरनिविदा करून पुन्हा नवीन पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक करण्यात यावी.
अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे

जनतेच्या पैशाचे होणारे नुकसान पाहिल्यानंतर सर्वसामान्य नागरिक म्हणून अत्यंत खेद होत असल्याचे भगत यांनी नमूद केले.
आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे किती लक्ष तालुक्यातील एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराबाबत आहे? हे यावरून लक्षात येते असे भगत यांनी यावेळी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.