Bhosari Crime News : कामगाराने कंपनीतून पळवला चार लाखांचा माल

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने कंपनीतून तीन लाख 94 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला. ही घटना डिसेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत एमआयडीसी भोसरी मधील युनिवर्सल गेजेस येथे घडली.

साबिरकुमार शिवशंकर सिंह (रा. गवळीमाथा, भोसरी. मूळ रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत बाळकृष्‍ण पांडुरंग गोरे (वय 43, रा. पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीत आरोपी साबिर कुमार हा काम करत होता. फिर्यादी यांनी साबिरकुमार याच्याकडे विश्वासाने कंपनीची चावी दिली होती. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत साबिरकुमार याने कंपनीतील थ्रेड गेजेसचा तयार माल व इन्स्ट्रुमेंट साहित्य असा एकूण तीन लाख 94 हजार 710 रुपयांचा माल चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.