Wakad Crime News : तरुणीचा विश्वासघात केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कामानिमित्त काही दिवस वापरण्यासाठी लॅपटॉप घेतला. तो लॅपटॉप सात महिन्यानंतरही परत न देता तरुणीचा विश्वासघात केला. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तीन ऑक्टोबर 2020 रोजी वाकड परिसरात घडला.

प्रताप सोनी (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही), असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पूजा रुपसिंग राजपूत (वय 20, रा. डांगे चौक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रताप सोनी याने फिर्यादी यांचा 41 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप काही दिवस कामानिमित्त वापरण्यासाठी घेतला. सात महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही आरोपीने लॅपटॉप परत केला नाही. फिर्यादी यांनी आरोपीकडे वारंवार मागणी करूनही लॅपटॉप परत न दिल्याबाबत विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.