Bhosari Crime News : भोसरी एमआयडीसी येथून पिस्टल व जिवंत काडतुसा सह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज –  भोसरी एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसीपरिसरातील हॉटेल जंजीर यथून एका तरुणाला पिस्टल व जिवंत काडतुसासह अटक (Bhosari Crime News )केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि.14) रात्री उशीरा केली.

अभिषेक युवराज कांबळे (वय २२, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एमआयडीसी मधील हॉटेल जंजीर समोरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 25 हजारांचे एक पिस्टल आणि  300 रुपयांचे एक जिवंत काडतूस  अशा एकूण 25 हजार 300 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार भागवत शेप यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध  बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील (Bhosari Crime News )तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.