Pimpri News : स्विकृत नगरसेवक पदावर एका ज्येष्ठ नागरिक सदस्याची निवड करावी : सचिन साठे

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एका स्विकृत नगरसेवक पदावर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या (Pimpri News)ज्येष्ठ सदस्याची निवड करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 147 ज्येष्ठ नागरिक संघाचा एक महासंघ आहे. या महासंघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार पिंपळे निलख येथील जय मल्हार जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने रविवार, जानेवारी 15, 2023 रोजी  करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरून बोलताना सचिन साठे यांनी सांगितले की, राज्य सरकारने नुकतेच मनपा मध्ये स्विकृत नगरसेवक संख्या वाढविणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यामध्ये विविध क्षेत्रातून निवृत्त झालेल्या अनुभवी जेष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये या ज्येष्ठ नागरिककांचा महासंघ देखील आहे. या महासंघातील पदाधिकाऱ्यांचा अनुभव शहराच्या विकासासाठी आणि ज्येष्ठाच्या समस्यांबाबत मनपा मध्ये धोरण ठरवण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे अशा अनुभवी एका ज्येष्ठ नागरिकाची निवड स्विकृत नगरसेवक पदी होणे हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिकेने त्याचबरोबर राज्यातील सर्व महानगरपालिकांनी स्विकृत नगरसेवक पदी जेष्ठ (Pimpri News)नागरिकांची निवड करणे उचित ठरेल असेही सचिन साठे म्हणाले.

Bhosari Crime News : भोसरी एमआयडीसी येथून पिस्टल व जिवंत काडतुसा सह तरुणाला अटक

यावेळी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष अरुण बागडे, नवनिर्वाचित अध्यक्ष वृषालीताई मरळ, जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश साठे, माजी नगरसेविका आरती चोंधे, माजी नगरसेवक तुषार कामटे, तसेच गणेश कस्पटे, ॲड. देसाई, दामू अण्णा जगताप, बाबासाहेब इंगवले, भास्कर इंगवले, शिरीष साठे, भरत इंगवले, भाऊसाहेब बडगे, जयवंत रानवडे, कल्पना सदाकाळ, सुशीला साठे, शोभा जगताप, राजेंद्र टकले, दौलत कामठे, प्रकाश बालवडकर, नाना सदाकाळ आदी उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष वृषालीताई मरळ, कार्याध्यक्ष बाबुराव फुले, सरचिटणीस ईश्वर चौधरी, सहसरचिटणीस शांताराम सातव, कोषाध्यक्ष हेमचंद्र जावळे, उपाध्यक्ष रामदास जगदाळे, तुकाराम कुदळे, माधव आडसूळ, सुनीता कोकाटे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी सचिन साठे म्हणाले की, महानगरपालिकेत ज्येष्ठांची निवड केल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या नियोजित विकासासाठी होईल. तसेच महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये ज्या ज्येष्ठांना स्वेच्छेने सेवा देण्याची इच्छा आहे त्यांना त्या उपक्रमात सामावून घेतले जावे. यात विविध क्षेत्रातील (Pimpri News) अनुभवी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा महानगरपालिकेच्या विकासास होईल असेही सचिन साठे म्हणाले.स्वागत रामदास जगदाळे, सूत्रसंचालन भास्कर इंगवले, आभार सुरेश साठे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.