Bhosari : रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडत असताना (Bhosari) एका तरुणाला अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.7) लांडगेनगर, भोसरी येथे घडला आहे.

अरूण सीयाराम तिवारी (वय 44, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल आहे. बिपीनकुमार असे मयत तरुणाचे नाव आहे.

Chinchwad : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शिवशंभो कार्यगौरव पुरस्काराने सन्मान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा बिपीनकुमार हा रस्ता ओलांडून जात असताना अज्ञात वहानाने त्याला जोरदार धडक दिली. यात बिपीनकुमार हा गंभीर जखमी झाला. मात्र वाहनचालक तेथे न थांबता निघून (Bhosari) गेला. त्यामुळे बिपीनकुमार यांचा उपचारा अभावी मृत्यू झाला आहे. यावरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.