Bhosari : फ्युएल पंपवरील कामगारांनीच केली मालकाची 21.50 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : भोसरीतील (Bhosari) फ्युएल पंपवरील कामगारांनी मालकाची 21.50 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत गणेश लांडगे (वय 35 वर्षे, रा. पांडुरंग रेसिडेन्सी, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वैभव जाधव (रा. दिघी) व रोहित माने (रा. सदगुरुनगर, भोसरी) यांच्या विरोधात भा.द. वि. कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : सृजन प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘समाजदूत’ पुरस्कार सोहळा संपन्न

1 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत भोसरी येथील लक्ष्मी एनर्जी अँड फ्युएल पंपावर घडली आहे. आरोपी यांनी लक्ष्मी एनर्जी अँड फ्युएल पंपावर काम करीत असताना संगणमत करून फिर्यादी यांची कोणतीही परवानगी न घेता स्वतःच्या आर्थिक (Bhosari) फायद्यासाठी मुद्दाम लबाडीच्या विचाराने स्वतःचा फोन पे क्यूआरकोड वापरून एकूण 21.50 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक करून पैशाचा अपहार केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.