Bhosari : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडाला अटक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी (Bhosari) तडीपार केलेल्या आरोपीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 23) रात्री दहा वाजताच्या सुमारास सहारा चौक इंद्रायणीनगर भोसरी येथे करण्यात आली.

सुरज प्रदीप शिंदे (वय 26, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विशाल काळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Sangvi : 333 टक्के परतावा मिळवून देतो म्हणून एकाची 43 लाख रुपयांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज शिंदे याला 27 नोव्हेंबर 2023 रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत एमआयडीसी (Bhosari) भोसरी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 300 रुपये किमतीचा एक कोयता जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.