Wakad : महिलेला धमकी देत घराच्या खिडक्यांची तोडफोड करत घरात कोंडले

एमपीसी न्यूज – महिलेला शिवीगाळ करत तिच्या (Wakad) घराच्या खिडकी व सीसीटिव्हीची तोडफोड करत महिलेला कोंडून ठेवण्यात आले. ही घटना थेरगाव येथे 31 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि.24) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून बालाजी शिंदे व त्याची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Bhosari : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या घराबाहेर येवून वेळोवेळी (Wakad) शिवीगाळ करत घराच्या खिडक्याच्या काचा व सीसीटिव्ही फोडून नुकसान केले. तसेच शिवीगाळ व दमदाटी करून महिलेला घरात कुलूप लावून कोंडले. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.