Alandi : कीर्तनकारांनी सांप्रदायिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे – ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी

एमपीसी न्यूज – कीर्तनकारांनी सांप्रदायिक, सामाजिक कार्याच्या (Alandi) समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे, असे मत ‘महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळा’चे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी यांनी व्यक्त केले.

‘डांगे पंच मंडळ कार्यालय’, आळंदी (पुणे) येथे नुकतेच कीर्तनकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. 100 हून अधिक जणांची या कार्यशाळेला उपस्थिती लाभली. ह.भ.प. नरहरी महाराज पुढे म्हणाले की, हिंदु जनजागृती समिती समवेत मी गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. वारकरी संप्रदाय आणि समितीने राज्यात एकत्रितपणे अनेक मोहिमा यशस्वीपणे राबवल्या आहेत. आज या कार्यशाळेतून जे ज्ञान मिळेल, ते आपण आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सर्व समाजात पोचवले पाहिजे. अशा प्रकारे कार्यशाळांचे आयोजन ठिकठिकाणी केले पाहिजे.

Wakad : महिलेला धमकी देत घराच्या खिडक्यांची तोडफोड करत घरात कोंडले

या कार्यशाळेचा आरंभ दीपप्रज्वलनाने झाला. या वेळी गुरुवर्य ह.भ.प. बंडातात्या कर्‍हाडकर, ह.भ.प. आत्माराम महाराज, ह.भ.प. रामचंद्र पेनोरे, ह.भ.प. पद्माकर पाटोळे महाराज, पंडित महाराज क्षीरसागर, ह.भ.प. राम सूर्यवंशी महाराज, ह.भ.प. रघुनाथ बापू चौधरी महाराज, पंडित महाराज क्षीरसागर, ‘जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थे’चे ह.भ.प. आत्माराम महाराज शास्त्री, निरंजन शास्त्री कोठेकर महाराज, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट उपस्थित होते. या कार्यशाळेत राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे (Alandi) आघात, तसेच लव्ह जिहाद, हलाल जिहाद आदींविषयी विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीचे महेश पाठक यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला.

या वेळी ‘जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थे’चे ह.भ.प. आत्माराम महाराज म्हणाले की, मनुष्याला धर्माची आवश्यकता आहे. धर्म हे जीवन आहे. ज्याप्रमाणे भूमी वृक्षाला आधार देते. त्याप्रमाणे धर्म मनुष्याला आधार देतो. धर्माविना मनुष्य जगू शकणार नाही. धर्म ही आपली आई आहे. त्यामुळे आपल्याला धर्माचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.