Sangvi : 333 टक्के परतावा मिळवून देतो म्हणून एकाची 43 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीत गुंतवणूक करा (Sangvi) आणि 333 टक्के परतावा देऊ असे आमिष देवून 43 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 17 जानेवारी 2024 रोजी ऑनलाइन पद्धतीने घडला आहे.

याप्रकरणी नागरिकाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मॉर्गन स्टॅन्ली कंपनीचे ग्रुप एडमिन शामस कपूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अमोल कोल्हे, प्रशांत जगताप यांच्या हस्ते पेटवली अनोखी होळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने मॉर्गन स्टॅन्ली नावाच्या कंपनीची जाहिरात पाहून त्यावर क्लिक केली. त्यानंतर फिर्यादीला एका ग्रूपवर घेण्यात आले. तेव्हा 333 टक्के परतावा मिळेल असे सांगण्यात आले. सुरुवातीला (Sangvi) फिर्यादीने 33 लाख 90 हजार रुपये गुंतवले. विश्वास बसावा म्हणून 1 लाख 25 हजार 794 रुपये दिले. नंतर पुढे गुंतवणूक करून 43 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केली. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.