Sangvi : शेअर्स खरेदीवर तिप्पट परताव्याच्या बहाण्याने नागरिकाची 65 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीच्या शेअर्स खरेदीवर तिप्पट परतावा देऊ असे ( Sangvi) आमिष दाखवून एका नागरिकाची 65 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 3 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 रोजी ट्रेडींग  ॲपद्वारे घडला आहे.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. यावरून धनंजय सिन्हा व अनुसुया गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Lokasabha Election 2024 : ‘आजोबा मतदानाला यायचं हं!’…विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला इन्स्टाग्राम वर व्हेलस कॅपीटल कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यावरून व्हॉटसअपवर लिंक पाठवली व शेअर्स खरेदी करण्यास सांगितले. यावेळी शेअर्सवर तीप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी 65 हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र कोणताही परतावा न देता फिर्यादीची फसवणूक केली आहे.सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल ( Sangvi) केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.