Holi Special Train : होळीनिमित्त हुबळी-अहमदाबाद विशेष रेल्वे पुणे मार्गे धावणार

एमपीसी न्यूज – होळी सणानिमित्त रेल्वे विभागाने हुबळी ते अहमदाबाद मार्गावर ( Holi Special Train ) दोन विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. ही रेल्वे पुणे मार्गे धावणार आहे.

गाडी क्रमांक 07311 हुबळी-अहमदाबाद स्पेशल एक्स्प्रेस 24 मार्च 2024 रोजी हुबळीहून सायंकाळी 07.30 वाजता सुटेल. ही गाडी 25 मार्च रोजी पहाटे 02.20 वाजता मिरजला पोहोचेल आणि 02.25 वाजता सुटेल. सांगलीला 02.37 वाजता पोहोचेल आणि 02.40 वाजता सुटेल. सातारा 04.57 वाजता पोहोचेल आणि 05.00 वाजता सुटेल. पुणे येथे सकाळी 08.05 वाजता पोहोचेल आणि 08.15 वाजता सुटेल, कल्याण 10.47 वाजता पोहोचेल आणि 10.50 वाजता सुटेल. 25 मार्च रोजी अहमदाबादला रोजी सायंकाळी 07.20 वाजता पोहोचेल.

Sangvi : शेअर्स खरेदीवर तिप्पट परताव्याच्या बहाण्याने नागरिकाची 65 हजार रुपयांची फसवणूक

गाडी क्रमांक 07312 अहमदाबाद – हुबळी एक्स्प्रेस अहमदाबादहून 25 मार्च 2024 रोजी रात्री 09.25 वाजता सुटेल आणि कल्याणला 26 मार्च रोजी पहाटे 05.20 वाजता पोहोचेल आणि  05.23 वाजता सुटेल. पुण्याला सकाळी 08.05 वाजता पोहोचेल आणि  08.15 वाजता सुटेल, सातारा येथे 10.50 वाजता पोहोचेल आणि 10.55 वाजता सुटेल, सांगलीला दुपारी 12.50 वाजता पोहोचेल आणि 12.55 वाजता सुटेल, मिरज येथे दुपारी 01.30 वाजता पोहोचेल आणि 01.35 वाजता सुटेल आणि हुबळी येथे 26 मार्च रोजी सायंकाळी 07.45 वाजता पोहोचेल.

ही गाडी हुबळी ते अहमदाबाद दरम्यान धारवाड, लोंडा, बेळगावी, घटप्रभा, मिरज, सांगली, सातारा, पुणे, कल्याण, वसई रोड, बोईसर, वापी, सुरत, वडोदरा आणि आणंद या स्थानकांवर थांबेल. गाडीला एक एसी 2 टियर, दोन एसी 3 टियर, 8 स्लीपर क्लास, 7 सामान्य द्वितीय श्रेणी, एक पँट्री कार असे एकूण 19 आयसीएफ कोच ( Holi Special Train ) असतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.