Holi Special Train : होळी सणासाठी पुण्यातून धावणार 62 विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज – होळी सण 24 मार्च रोजी आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतात हा (Holi Special Train)सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर भारतातील अनेक कामगार, नोकरदार, व्यावसायिक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात आले आहेत. त्यांना होळीच्या सणाला गावी जाता यावे, यासाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. पुणे स्थानकावरून उत्तर भारतात जाण्यासाठी 40 तर गोवा येथे जाण्यासाठी 14 गाड्या सोडल्या जाणार आहेत. उर्वरित आठ गाड्या दौंड येथून अजमेरसाठी धावणार आहेत.

पुणे- वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन- पुणे (32 ट्रीप)
गाडी क्रमांक 01921 पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन साप्ताहिक (Holi Special Train)विशेष एक्स्प्रेस पुण्याहून 14 मार्च ते 27 जून या कालावधीत दर गुरुवारी दुपारी 3.15 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शनला पोहोचेल.

गाडी क्रमांक 01922 वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन – पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर बुधवारी 13 मार्च ते 26 जून या कालावधीत वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन येथून दुपारी 12.50 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 11.35 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे – दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापुरम, भोपाळ, विदिशा, बीना आणि ललितपूर.

दौंड – अजमेर – दौंड (8 ट्रिप)
गाडी क्रमांक 09626 दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 15 मार्च ते 05 एप्रिल पर्यंत दर शुक्रवारी रात्री 11.10 वाजता दौंडहून सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री 11.40 वाजता अजमेरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 09625 अजमेर – दौंड साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस 14 मार्च ते 04 एप्रिल पर्यंत दर गुरुवारी अजमेरहून सायंकाळी 05.05 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी 06.20 वाजता दौंडला पोहोचेल.
थांबे – पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, बोईसर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, दाहोद, रतलाम, नागदा, भवानी मंडी, रामगंजमंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, किशनगड आणि मदार जंक्शन.

पुणे – कानपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (4 फेऱ्या)
01037 विशेष 20 मार्च आणि 27 मार्च रोजी पुणे येथून सकाळी 06.35 वाजता सुटेल. कानपूर सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 07.10 वाजता पोहोचेल. (2 फेऱ्या)
01038 विशेष 21 मार्च आणि 28 मार्च रोजी कानपूर सेंट्रल येथून 08.50 वाजता सुटेल. पुणे येथे दुसऱ्या दिवशी 12.05 वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबे – दौंड कॉर्डलाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि ओराई.

पुणे – सावंतवाडी साप्ताहिक वातानुकूलित विशेष (6 फेऱ्या)
01441 विशेष गाडी 12 मार्च, 19 मार्च आणि 26 मार्च रोजी पुणे येथून 09.35 वाजता सुटेल. सावंतवाडी येथे त्याच दिवशी रात्री 10.30 वाजता पोहोचेल. (3 फेऱ्या)
01442 विशेष 13 मार्च, 20 मार्च आणि 27 मार्च रोजी सावंतवाडी येथून रात्री 11.25 वाजता सुटेल. पुणे येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.15 वाजता पोहोचेल. (3 फेऱ्या)
थांबे – लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

पुणे – थिवि साप्ताहिक विशेष (8 फेर्‍या)
01445 विशेष 8 मार्च, 15 मार्च, 22 मार्च आणि 29 मार्च रोजी पुणे येथून सायंकाळी 06.45 वाजता सुटेल. थिवि येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 08.30 वाजता पोहोचेल. (4 फेऱ्या)
01446 विशेष 10 मार्च, 17 मार्च, 24 मार्च आणि 31 मार्च रोजी थिवि येथून सकाळी 09.45 वाजता सुटेल. पुणे येथे त्याच दिवशी रात्री 11.55 वाजता पोहोचेल. (4 फेर्‍या)
थांबे – लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

पुणे – दानापूर साप्ताहिक अतिजलद विशेष (4 फेर्‍या)
01105 विशेष गाडी 17 मार्च आणि 24 मार्च रोजी पुणे येथून सायंकाळी 04.15 वाजता सुटेल. दानापूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री 10.00 वाजता पोहोचेल. (2 फेर्‍या)
01106 विशेष 18 मार्च आणि 25 मार्च रोजी दानापूर येथून रात्री 11.30 वाजता सुटेल. पुणे येथे तिसऱ्या दिवशी सायंकाळी 06.25 वाजता पोहोचेल. (2 फेऱ्या)
थांबे – दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर (फक्त 01106 साठी), कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.