Ghazipur Bus Fire : गाझीपूरमध्ये बसला भीषण आग; वरातीच्या बसवर पडली हाईटेंशन वायर, पाच जणांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज : उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून एक (Ghazipur Bus Fire) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मर्दाह पोलीस ठाण्याच्या हद्दीत मढ येथून लग्नाची मिरवणूक घेऊन जाणाऱ्या बसवर हाईटेंशन वायर पडली. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात बसला आग लागली आहे. हाईटेंशन वायरचा शॉक बसल्याने बसमध्ये प्रवास करणारे लोक भाजले आहेत. ही बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. विद्युतप्रवाहामुळे लोकांना बाहेर पडण्यास अडचणी निर्माण झाली.

या प्रकरणाची माहिती शासनस्तरावरही घेतली जात आहे. बस प्रवाशांनी खचाखच भरल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. वायर पडल्याने बसने पेट घेतला. विद्युतप्रवाह थांबल्यानंतर कसेतरी लोक बाहेर आले. या आगीत बेशुद्ध झालेले लोकही भाजल्याची चर्चा आहे.

यावेळी बसमध्ये 50 जण होते. आग इतकी भीषण होती की आग विझवण्यासाठी बसजवळ जाण्याचे धाडस कोणीच करू शकले नाही. या आगीत आतापर्यंत चार जण दगावल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघातात आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. बस सीएनजी असल्याचे निष्पन्न झाले.

Pune : नाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता

मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा (Ghazipur Bus Fire) केली –

गाझीपूरमध्ये झालेल्या भीषण बस अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींवर चांगल्या उपचाराची व्यवस्था करावी, मदत आणि बचाव कार्याला गती द्यावी. असे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी अपघातातील मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.