Rajyasabha Election : तीन राज्यांत राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान

एमपीसी न्यूज – राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज ( Rajyasabha Election)  तीन राज्यांत आज मतदान होणार आहे.राज्यसभेच्या एकूण 56 जागांपैकी 41 जागा बिनविरोध झाल्या आहेत. पण उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे येथे मतदान घ्यावे लागणार आहे. हे मतदान आज होणार आहे.

Dighi : डिफेन्स एक्स्पोमध्ये 1358 कोटी रुपयांचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशातील दहा राज्यसभा जागांसाठी एकूण 11  उमेदवार मैदानात आहेत. त्यात 8  भाजपचे आणि तीन समाजवादी पक्षाचे आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये  भाजपकडे जिंकण्यासाठी पुरेसे आमदार नसतानाही त्यांनी एका जागेसाठी अभिषेक मनु सिंघवी (काँग्रेस ) यांच्या विरोधात हर्ष महाजन यांना उभे करून निवडणूक रोमांचक बनवली आहे.

राज्यसभेच्या आताच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक वीस जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर कॉंग्रेस सहा, तृणमूल कॉंग्रेस चार, वायएसआर कॉंग्रेस तीन, राजद, बिजेडीला प्रत्येकी दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, बीआरएस, जेडीयूला प्रत्येकी एक-एक जागा ( Rajyasabha Election) मिळाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.