Bjp: लोकसभेसाठी भाजपाची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर ;मोदी ‘या’ मतदारसंघातून लढवणार खासदारकी

एमपीसी न्यूज -आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Bjp)भाजपने उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे.

 

भाजपचे सरचिटणीस ,पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2024 लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून येथून लढणार तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुसऱ्यांदा गुजरात मधील गांधीनगरमधून  लढणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच यावेळी भाजपच्या 195उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहे.

यासोबतच भाजपकडून 16 राज्य आणि 2 केंद्र शासीत प्रदेशांमधील तब्बल 195 जागांचा निर्णय झाला असल्याची माहिती  विनोद तावडे यांनी दिली. यामध्ये पंतप्रधान मोदी हे वाराणसी येथून निवडणूक लढवणार आहेत.

तसेच त्यांच्यासोबत 34 केंद्रीय व राज्य मंत्री हे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत.एक लोकसभा अध्यक्ष आणि दोन माजी मुख्यमंत्री यांची नावे देखील  195उमेदवारांमध्ये आहेत.

 

Pune: 4 चा प्रभाग भाजपसाठी फायदेशीर

यामध्ये 28महिलांचा समावेश आहे. 50 पेक्षा कमी वय असलेले 47 युवा उमेदवार असणार आहेत. तसेच या यादीमध्ये अनुसूचित जाती 27, अनुसूचित जमाती 18, ओबीसी 57 उमेदवार असणार आहेत, अशा प्रकारे समाजातील सर्व वर्गांना उमेदवारी देताना पहिल्या यादीत प्रतिनीधीत्व देण्यात आल्याचे देखील यावेळी भाजपकडून सांगण्यात आले.

पहिल्या यादीत ज्या राज्यांचा विचार झाला आहे ती यादी यावेळी सांगण्यात आली. यामध्ये पुढील प्रमाणे जागांची घोषणा करण्यात आली.
उत्तर प्रदेश- 51, पश्चिम बंगाल – 20, मध्य प्रदेश – 24, गुजरात – 15,  राजस्थान – 15 ,केरळ – 12, तेलंगणा – 9, आसाम – 11 (एकूण जागा 14), झारखंड – 11, छत्तीसगड – 11, दिल्ली – 5, जम्मू – काश्मीर – 2, उत्तराखंड – 3, अरुणचाल प्रदेश – 2, गोवा – 1, त्रिपुरा – 1, अंदमान – निकोबार – 1,दीव आणि दमण -1

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.