Pune: 4 चा प्रभाग भाजपसाठी फायदेशीर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका निवडणुकीसाठी 4 चा प्रभाग (Pune)असणार आहे. तसा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. याचा फायदा भाजपला होणार असल्याची चर्चा आहे. ‘मिनी आमदारकी’ म्हणून ही निवडणूक होणार आहे.
छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना यामुळे संधी मिळणार नाही. महापालिकांमध्ये(Pune) पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णयामुळे शहरातील प्रभागांची संख्या एक किंवा दोनने वाढण्याची शक्यता आहे.
तसेच ‘एक वाॅर्ड- एक नगरसेवक’ या प्रभाग पद्धतीऐवजी चार सदस्यांचा एक प्रभाग ही रचना सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. 2014 पासून प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर महापालिकेत भाजपला सर्वाधिक 98 जागा मिळाल्या. एक वाॅर्ड एक नगरसेवक या रचनेत महापालिकेत भाजपला आत्तापर्यंत कमाल पंचवीस जागा मिळवता आल्या आहेत.

Pune: पवारांचे कट्टर विरोधक अनंतराव थोपटे यांची सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट

मुंबई वगळता राज्यातील अन्य सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे.
लांबणीवर पडलेली महापालिकेची निवडणूक कधी होणार हा प्रश्न कायम असला तरी बहुसदस्यीय प्रभाग रचना भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. सध्या पुणे महापालिकेत प्रशासकीय राज सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची कामे रेंगाळली आहे. महापालिका निवडणूक तातडीने व्हावी, यासाठी काहीजण न्यायालयात गेले आहे. मात्र, तेथेही सुनावणी पुढे पुढे जात आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक होणार तरी कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वॉर्ड रचनेत भाजपला महापालिकेत आतापर्यंत सर्वाधिक 25, तर प्रभाग रचनेत99जागा मिळाल्या आहेत. त्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला ६, ९, १४ अशा जागा मिळाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने वाॅर्ड रचना आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यामुळे भाजपला आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, चार नगरसेवकांचा एक प्रभाग ही पद्धती भाजपसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.