Pune: पवारांचे कट्टर विरोधक अनंतराव थोपटे यांची सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे कट्टर विरोधक समजले (Pune)जाणारे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली. 

 

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती(Pune) लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अनंतराव थोपटे हे नेहमीच एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जातात.
बारामती लोकसभा मतदारसंघात भोर वेल्हा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. अनंतराव थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांचा छुपा प्रचार केला होता. मात्र, आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर थोपटे कोणाचा प्रचार करणार? असा प्रश्न पडला आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांनी भेट घेतल्यामुळे थोपटे अजितदादा गटाचा प्रचार करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Pune: 15 ते 20 वर्षातील  कल पाहून विद्यार्थ्यांनी शिक्षण आत्मसात करावे – किरण केंद्रे 

बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांनी तुतारी चिन्हासोबत फोटो ट्विट करून आपल्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. तर, सुनेत्रा पवार यांनीही आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
भोर तालुक्याच्या दौरा दरम्यान सुनेत्रा पवार यांनी थोपटे कुटुंबीयांची भेट घेतली. आमदार संग्राम थोपटे, त्यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे, मुलगा पृथ्वीराज थोपटे यावेळी उपस्थित होते. भोर मतदारसंघावर सुरुवातीपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार होते.
सोबतच ते मंत्री देखील होते. त्यानंतर त्यांचे पुत्र संग्राम थोपटे हे गेली १८ वर्षे आमदार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. काहीच दिवस शिल्लक राहिल्याने सुनेत्रा पवार यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. महायुतीच्या जागावाटपात बारामती लोकसभा मतदारसंघ हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.