Pune: 15 ते 20 वर्षातील  कल पाहून विद्यार्थ्यांनी शिक्षण आत्मसात करावे – किरण केंद्रे 

एमपीसी न्यूज – भविष्यातील विविध क्षेत्रातील १५ ते २० वर्षातील (Pune)कल पाहून विद्यार्थ्यांनी शिक्षण आत्मसात करावे, असे आवाहन किशोरचे संपादक किरण केंद्रे यांनी केले. 
संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष, पुण्यनगरीचे माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या (Pune)जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण  समारंभ आज महर्षी कर्वे विद्यालय ,कर्वेनगर  येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. निबंध स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण किशोरचे संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दिलीप बराटे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, मुख्याध्यापक जगताप,  कांबळे, काळेल, पवार, डॉ. त्रिमुखे आदि मान्यवर उपस्थित होते.
 किरण केंद्रे म्हणाले, बाल साहित्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार घडतात. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण होते. संघर्ष हा जगण्याचा अविभाज्य भाग असून वर्तमानात सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी अपेक्षित आहे. जात धर्म या पलीकडे जाऊन व स्त्री पुरुष भेद न मानता माणूसपण जपणे गरजेचे आहे.

 

Pimpri: कॅन्सर पीडित महिला आणि अंध मुलींनी केला रॅम्पवॉक ;एक हात मदतीचा आगळावेगळा फॅशन शो

जो पुस्तक वाचेल तो जग वाचेल. पुस्तक वाचनाने आपण समृद्ध होतो. शिक्षकांनी व पालकांनी  विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. स्वतः शिक्षकांनी देखील ग्रंथांचे व नियतकालिकांचे वाचन करणे आवश्यक आहे.
निबंध स्पर्धेला विद्यार्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. एकूण1000माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
 दिलीप बराटे म्हणाले, ‘आधुनिक युगात शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देखील महत्त्वाचे आहे. प्रसारमाध्यमातून भविष्यात विद्यार्थ्यांना चांगली संधी निर्माण होऊ शकते. साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान या क्षेत्रामध्ये भरारी घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असून त्यादृष्टीने शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या बाहेरचे ज्ञान देणे योग्य ठरेल.
     पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रास्ताविकातून  मुख्याध्यापक विठ्ठल शिंदे यांनी समारंभाचा उद्देश विशद केला. समारंभाचे  सूत्रसंचालन गुंजाळ यांनी केले, पाहुण्यांची ओळख डॉ. राजेंद्र थोरात यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन देवकर यांनी केले. मुख्याध्यापक ताम्हाणेसर यांनी निकाल घोषित केला.
*निबंध स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे*
*प्रथम क्रमांक*- जाधव नेहा राम, नवभारत हायस्कूल शिवणे, रोख 5000 रुपये व प्रमाणपत्र
*द्वितीय क्रमांक*-  सानिका संजय बावचे महिलाश्रम विद्यालय, कर्वेनगर रोख 3000रुपये व प्रमाणपत्र
*तृतीय क्रमांक*-  संतोषी बाळासाहेब कुमकर नेर्लेकर विद्यालय, खडकवाडी रोख  2000रुपये व प्रमाणपत्र
*उत्तेजनार्थ पारितोषिके* प्रत्येकी 1000 रूपये व प्रमाणपत्र:
शर्मा प्रतिभा अभिमन्यू- माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वारजे,
अन्नू शामदेव मोरया-  मनपा वारजे, कार्तिकी सतीश पायगुडे- नेर्लेकर विद्यालय खडकवाडी
ईशांत प्रभाकर पठाडे- माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खडकवाडी
मानसी शरद गायकवाड- शानु पटेल विद्यालय वारजे,
साक्षी केशव मानकर- सिंहगड माध्यमिक विद्यालय सांगरुण
मोनाली हनुमंत पवार- महर्षी कर्वे विद्यालय कर्वेनगर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.