Pune News : दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात होळीनिमित्त 100 किलो द्राक्षांची आकर्षक आरास

एमपीसी न्यूज : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे होळी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील दत्त मंदिरात 100 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. द्राक्षांचे घड, विविध प्रकारची पाने व फुलांचा वापर करून ही सजावट साकारण्यात आली होती.

पंढरपूर येथील व्यावसायिक प्रकाश कुलकर्णी यांच्यातर्फे ही आरास करण्यात आली. सुभाष सरपाले यांनी सजावट केली होती. होळी पौर्णिमेनिमित्त साकारलेली आरास सोमवार, दि. 29 मार्चपर्यंत असणार आहे. होळीनिमित्त ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर यांच्या हस्ते दत्तयाग होणार आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी म्हणाले, होळी पौर्णिमेनिमित्त दत्त महाराजांना हा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. कार्निशन, ऑर्चिड, अ‍ँन्थोरियम, जिप्सो यांसह हिरव्या पानांचा देखील आरास करण्याकरिता वापर करण्यात आला. द्राक्षांचा प्रसाद मंदिरात येणाऱ्या भाविकांना तसेच सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.