BJP : भुतकाळातील गोष्टी विसरून कामाला लागा, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यकारिणीला सूचना

एमपीसी न्यूज – शहरामध्ये मोठ्या  (BJP) संख्येने नागरिक भाजपाचे समर्थन करीत आहेत. नागरिकांची कामे कुठे अडणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. भुतकाळातील गोष्टी विसरून नव्या विचारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वांचा सन्मान राखून संघटना बळकटीसाठी जोमाने कामाला लागणे आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांना दिला.

भारतीय जनता पार्टीची शहर (जिल्हा) कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर शहराध्यक्ष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जिल्हा कार्यकारिणी बैठक आज (शनिवारी) मोरवाडी येथील भाजप पक्ष कार्यालयात पार पडली. भाजपाच्या पिंपरी चिंचवड शहर प्रभारी वर्षा डहाळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, सरचिटणीस नामदेव ढाके, माऊली थोरात, शितल शिंदे, संजय मंगोडेकर, शैला मोळक, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र राजापुरे यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील कार्यकत्यांना न्याय देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. संघटनेत काम करताना सर्वांनी एकमेकांशी संवाद साधा. आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे आहे, असे शहराध्यक्ष जगताप म्हणाले.

PCMC : शहराच्या सुरक्षेसाठी 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे

बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत (BJP) पारित केलेल्या महिला आरक्षणाचा अभिनंदनपर ठराव मांडण्यात आला. तसेच, नवनियुक्त भाजपा शहर कार्यकारणीचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.

त्याचबरोबर, मावळ लोकसभा संयोजकपदी माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव पारीत झाला. तसेच, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर कार्यालय येथे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सूचना पेटी लावण्याबाबत ठराव मांडून त्याबाबत उपस्थितांना सूचना देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.