Bopodi News : बोपोडी येथील मुळा नदीत सापडला 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज -एका 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह बोपोडी येथील (Bopodi News)मुळा नदीत आज मंगळवार 17 जानेवारी रोजी सापडला आहे. तो तरुण बोपोडीतील रहिवासी होता.

 पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या औंध केंद्राला  माहिती मिळाली की ,  दुपारी 12:15 वाजता एक मृतदेह नदीत तरंगत आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना हा मृतदेह मुळा नदीत हॅरीस पुलाजवळ तरंगताना दिसला.  त्यांनी तो नदी बाहेर काढला . तो मृतदेह एका 31 वर्षीय तरुणाचा होता. तो तरूण 5 ते 6 दिवसांपूर्वी नदीत पडला असावा ,कारण मृतदेह थोडा कुजलेल्या अवस्थेत  होता.

Chinchwad News: “आध्यात्मिक विचारांशिवाय तरणोपाय नाही”ज्येष्ठ प्रवचनकार किसनमहाराज चौधरी

याबाबत खडकी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलिसांनी सांगितले की मृतदेह ससून (Bopodi News) हॉस्पिटल ला पाठविण्यात आला आहे. मयत व्यक्तीचे नातेवाईक सोबत गेले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.