Buldhana Travel Accident : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघात (Buldhana Travel Accident ) झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  हा अपघात बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथील पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर झाला. 

विदर्भ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 29 बी ई 1819 ही 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती. 1 जुलै च्या रात्री 1.22 मिनिटाने विदर्भ ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.

पलटी झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने काही मिनिटामध्ये पेट घेतला. त्यानंतर गाडीचा स्फोट होऊन संपूर्ण ट्रॅव्हल पुर्णपणे जुळून खाक झाली. या ट्रॅव्हल्समधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. बुलढाण्याचे डेप्युटी एसपी बाबुराव महामुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधून 25 जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकूण  33 प्रवासी या ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होते. त्यातील  8 लोक जखमी झाले आहेत. जखमींना बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

Today’s Horoscope 1 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.फायर ब्रिगेडच्या मदतीने ट्रॅव्हल्सला लागलेली आग विझवण्यात आली. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात (Buldhana Travel Accident ) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.