Shirur : समृद्धी महामार्गावरील अपघातात शिरूर येथील शिक्षक कुटुंबाचा दुर्दैवी अंत; मुलासोबतचा फोटो ठरला अखेरचा

एमपीसी न्यूज : आज बुलढाणा येथे विदर्भ समृद्धी महामार्गावर (Shirur ) ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये तब्बल 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताने शिरूर येथील एका शिक्षक कुटुंबातील तीन जणांचा बळी घेतला. या कुटुंबाने आपल्या मुलासोबत काढलेला फोटो हा अखेरचा ठरला. 

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावातील कैलास गंगावणे हे या बस ट्रॅव्हल्समध्ये आपली पत्नी आणि मुलगी समवेत प्रवास करत होते. ते आपल्या मुलाला नागपूर येथे भेटण्यास गेले होते.

कैलास गंगावणे हे शिरूर येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील या महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. ते या महाविद्यालयात गेली 25 वर्ष कार्यरत होते.

हे कुटुंब नागपूर येथे वकिलीचे शिक्षण घेत असल्याने मुलाला भेटायला गेले होते. तेथे त्यांच्या मुलीने आई, वडील आणि मुलासोबत फोटोही काढला. जो फोटो अखेरचा ठरला.

Pune : बाल हक्कासाठी प्रयत्न करून बाल स्नेही महाराष्ट्र घडविणार – ॲड. सुशीबेन शहा

कैलास गंगावणे यांचे बंधु रुपेश हे शिक्षण मंडळाचे माजी सभापती असून सुरेश हे विद्याधाम शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या कुटुंबावर (Shirur) हा मोठा आघात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तर गंगावणे कुटुंब हे बुलढाणा येथे रवाना झाले आहेत. मृत कुटुंबियांची  ओळख पटण्यासाठी डीएनए टेस्ट करावी लागणार आहे.

गंगावणे कुटुंबियांचे सर्वांशी स्नेहाचे संबंध होते. तर त्यांची मुलगी डॉक्टर होती. मुलगा वकलीचे शिक्षण घेत आहे. भविष्यात मुलाला वकील झाल्याचे पाहायला मात्र त्याचे कुटुंबीय राहिले नाहीत याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.