Chikhli : भरदिवसा रिक्षा चालकाला मारहाण करत प्रवाश्यांनीच रिक्षा नेली चोरून

एमपीसी न्यूज – रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या चौघांनी रिक्षा चालाकाला मारहाण करत त्यांचा मोबाईल व रिक्षा चोरून नेली आहे. हा प्रकार चिखली (Chikhli ) ते मोईगाव या मार्गावर सोमवारी (दि.12) सकाळी नऊ ते साडे नऊच्या दरम्यान घडला.

Ravet : सेंटोसा वॉटरपार्कमध्ये पाण्यात बुडून 6 वर्षीय मुलीचा मृत्यू

याप्रकरणी रिक्षा चालक धनंजय सुनिल चौधरी (वय 39 रा. मोशी) यांनी बुधवारी (दि.14) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विशाल मोरे (रा. चिखली) व त्याचे तीन मित्र यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची रिक्षा (एम एच 12 के आर 5073) जवळ थांबले असताना आरोपी तेथे आले व त्यांनी मोईगाव येथे जायचे आहे असे सांगितले. यावेळी रिक्षात बसल्यानंतर काही अंतर जाताच त्यांनी फिर्यादीला माराहाण करत शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. त्यांनी फिर्यादी कडून त्यांचा 5 हजार रुपयांचा मोबाईल व 70 हजार रुपयांची रिक्षा हि जबरदस्तीने चोरून नेली. यावरून चिखली (Chikhli)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.