Pimpri : रिक्षाचालकाला मारहाण करून पळालेला बालक पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पेसेंजर म्हणून रिक्षामधून जात असताना वारंवार रिक्षाबाहेर थुंकल्याबद्दल रिक्षा चालकाने मुलाला जाब विचारला. त्यांमुळे त्याने त्यांच्या अन्य साथीदारांना बोलावून रिक्षा अडवून चालकाला मारहाण केली. त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील फरार असलेल्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी रविवारी (दि. 30) ताब्यात घेतले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर 2018 रोजी एक मुलगा रिक्षातून प्रवास करत होता. त्याच्यासोबत अन्य तीन प्रवासी होते. मुलगा रिक्षातून वारंवार थुंकत होता. त्यामुळे रिक्षाचालकाने त्याला ‘तू का सारखा थुंकतोस. पॅसेंजरच्या अंगावर थुंकी जात आहे.’ याचा राग मनात धरून मुलाने त्याच्या अन्य तीन साथीदारांना बोलावून आणले. चौघांनी मिळून रिक्षासमोर मोठा दगड ठेऊन रिक्षा अडवली आणि चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

निगडी पोलिसांनी यातील तीन जणांना अटक केली होती. मात्र एक अल्पवयीन मुलगा अद्याप फरार होता. पोलीस नाईक सावन राठोड यांना माहिती मिळाली की, हा अल्पवयीन मुलगा रामनगर भागात फिरत आहे. त्यावरून सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी करून निगडी पोलिसांकडे देण्यात आले.

ही कारवाई ही कामगिरी पोलीस आयुक्‍त आर के पद्‌मनाभन, अपर आयुक्‍त मकरंद रानडे, सहायक आयुक्‍त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र राठोड, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, संतोष बर्गे, प्रमोद वेताळ, सावन राठोड, अमित गायकवाड, सुनील चौधरी, प्रमोद हिरळकर, सचिन मोरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.