Akurdi: 85 हजारात आय फोन 15 प्रो देतो म्हणत मोबाईल शॉपी धारकाची फसवणूक, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज –  नवीन आय फोन 15 प्रो मॅक्स हा फोन केवळ 85 हजार (Akurdi)रुपयात देतो म्हणत एका मोबाईल शॉपी धरकाची 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार सोमवारी (दि.11) आकुर्डी येथे घडला.
याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपीला निष्पन्न करत (Akurdi)गणेश अशोक भालेराव (वय 29 रा. खराडी, पुणे) याला अटक केली आहे, याप्रकरणी आनंद नामदेव आसवाणी (वय 32 रा. पिंपरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Bhosari: बेकायदेशीर रित्या गॅस छोट्या सिलेंडर मध्ये भरल्या प्रकरणी एकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने फोन करून मंयक शर्मा बोलत असल्याचे सांगितले. त्याने नवीन आय फोन 15 फ्रो मॅक्स हा फोन केवळ 85 हजार रुपयात देण्याची ऑफऱ दिली तसेच फिर्यादीच्या मोबाईल शॉपीमधूम सॅमसंग  एस 24 अल्ट्रा फोन घेणार आहे.

 

त्यमुळे अडवान्स म्हणून 15 हजरा राहू द्या फक्त 70 हजार रुपये  द्या असे सांगितले. पुढे आरोपीने फिर्यादी यांना आकुर्डी येथील एका ऑपीस जाऊन फोन कलेक्ट करण्यास सांगितले.त्यानुसार फिर्यादी तेथे गेले. तेथे त्यांनी फिर्यादीले एका युपीआय आयडी वर 70 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र फोन दिला नाही. यावरून निगडी पोलीसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.