AAdhar : आधार मोफत अपडेटसाठी मुदत वाढली; कसे कराल आधार अपडेट, जाणून घ्या..

एमपीसी न्यूज – प्रत्येकाला एकमेवाद्वितीय क्रमांक आणि (AAdhar)ओळख देणाऱ्या आधार कार्डला मोफत अपडेट करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. याबाबत युआयडीएआय (UIDAI) ने माहिती दिली आहे. आता 14 जून पर्यंत मोफत माहिती अपडेट करता येणार आहे.

ज्या नागरिकांनी दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड काढले आहे, (AAdhar)त्यांच्याकडून UIDAI ने पुन्हा ओळख आणि पत्त्याचा पुरावा मागितला आहे. त्यामुळे त्या नागरिकांना आधार अपडेट करणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला वेगळा 12 अंकी क्रमांक देण्यात आला आहे.

 

Pimpri : शहरातील सोसायटी धारकांच्या प्रश्नांसाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र विभाग करा                                 

https://x.com/UIDAI/status/1767418444465549723?s=20

आधार ऑनलाईन माध्यमातून अपडेट करण्यासाठी https://myaadhaar uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जा. आधार नंबर आणि ओटीपीच्या मदतीने वेबसाईटवर लॉगिन करा. प्रोफाईलवर आपली ओळख, पत्ता, अन्य तपशील दिसेल. आपली माहिती योग्य असल्यास व्हेरिफाय या पर्यायावर क्लिक करा. त्या माहितीत बदल झाला असेल, तर नवीन ओळखपत्र अपलोड करण्याचा पर्याय निवडा. नवीन ओळखपत्र अपलोड करा. पत्त्याचा पुरावा अपलोड करण्यासाठी योग्य ते डॉक्युमेंट निवडून अपलोड करा. त्यानंतर सबमिट केल्यास आपले आधार अपडेट होईल.

ऑफलाईन माध्यमातून आधार अपडेट करण्यासाठी आपल्या जवळचे आधार केंद्र माहिती असणे आवश्यक आहे. ते शोधण्यासाठी https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या संकेतस्थळावर जा. तिथे आपले लोकेशन अथवा पिन कोड क्रमांक समाविष्ट करा. त्यानंतर आपल्या जवळच्या आधार केंद्राची माहिती येईल. जवळच्या आधार केंद्रात जा आणि योग्य कागदपत्रे व माहिती देऊन आधार अपडेट करा.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.