Ravet : सेंटोसा वॉटरपार्कमध्ये पाण्यात बुडून 6 वर्षीय मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रावेत (Ravet) येथील सेंटोसा वॉटर पार्क येथे 6 वर्षीय मुलीचा स्विमिग पुलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात सेंटोसा वॉटर पार्कच्या मॅनेजर व सुपर वायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी ( दि.12) दुपारी घडली.

Talwade : पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

मॅनेजर अजय हरीलाल हिंदुजा (रा. पिंपळे सौदागर) व सुपरवायझर राहुल आबा मोरे (रा. रावेत) यांच्यावर बुधवारी (दि.14) गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार राकेश शांताराम पालांडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगी ही सेंटोसा पार्क येथे तिची आई व दोन भावासह पिकनिकला आली होती. यावेळी तेथे कोणताही सुरक्षा रक्षक नसताना,कोणतेही सुरक्षा भिंत,लाईफ जॅकेट अशी कोणतीच सुविधा नसल्याने मयत मुलगी थेट स्विमिंग पूलच्या पाण्यात बुडून मेली. यावरून वॉटर पार्कच्या यंत्रणेवर गुन्हा दाखल केला असून रावेत (Ravet ) पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.