Talwade : पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

एमपीसी न्यूज – खेळणाऱ्या पाच वर्षाच्या मुलीला उचलून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. हा किळसवाणा प्रकार बुधवारी (दि.14) तळवडे (Talwade) येथे एका मंदिराच्या मागे मोकळ्या जागेत घडला आहे.

Pimpri : बकरी ईदसाठी तात्पुरत्या स्वरूपात नेहरूनगर येथे कत्तलखाना

गणेश किसन चव्हाण (वय 35 रा.तळवडे) असे अटक आरोपीचे नाव असून तो मजुरीचा धंदा करतो. त्याचावर देहुरोड पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पाच वर्षाची मुलगी हि मंदिरात खेळत होती. यावेळी आरोपीने तिला मंदिरातून उचलून नेले व मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी एका महिलेने त्याला या अवस्थेत पाहिले असता तो तेथून पळून गेला. देहुरोड पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.